🚦 *पुणे शहर वाहतूक पोलिसांची रस्ता सुरक्षा व वाहतूक जनजागृती मोहीम* 🚦
*Safe Road PUNE 2026 – रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान*
*पुणे शहरातील वाढते प्राणांकित अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी
**1) *चतुशृंगी वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी API राजकुमार केंद्रे व त्यांचे टीमने औंध गाव व शिवाजी विद्यालय परिसरामध्ये शिवाजी विद्यालय येथील विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या मदतीने रस्ता सुरक्षा व वाहतूक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले सदर वेळी वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी जनजागृती पर फलक दाखवून हेल्मेट परिधान करणारे दुचाकीस्वार व सीट बेल्टचा वापर करणारे वाहन चालक यांचे गुलाब पुष्प देऊन कौतुक केले व जनजागृती केली* *
*2) फुरसुंगी वाहतूक विभागाचे PI राजेंद्र करणकोट व त्यांचे टीमने मंतरवाडी चौक येथे मालवाहतूक करणारे टेम्पो चालक-मालक यांना गंभीर अपघात होऊ नये म्हणून घ्यावयाची दक्षता बाबत सूचना देऊन जनजागृती केली सदर वेळी 50 ते 55 टेम्पो ट्रान्सपोर्ट मधील चालक-मालक हजर होते*
*3) *बंडगार्डन वाहतूक विभागाचे API विशाल दांडगे व त्यांची टीमने आरटीओ चौक, शाहीर अमर शेख चौक येथे ए आय एस एस एम एस कॉलेज मधील विद्यार्थी यांचे सह रस्ता सुरक्षा व वाहतूक जनजागृती अभियानाची आयोजन करून सदर चौकामध्ये वाहतूक सूचनाफलक दाखवून रस्ता सुरक्षा बाबत वाहन चालकांमध्ये जनजागृती केली ** *तसेच अलंकार चौक व आयबी चौक येथे S J Contraction co.Ltd कंपनीच्या 30 स्वयंसेवकांच्या मदतीने विशेष जनजागृती करण्यात आली त्यात यमराजाच्या प्रतीकात्मक वेशभूषेतील व्यक्तीमार्फत पथनाट्य सादर करून विना हेल्मेट वाहन वाहनचालकांचे प्रबोधन करून हेल्मेट परिधान केलेल्या व नियमांचे पालन करणाऱ्या वाहन चालकांचे गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन शुभेच्छा दिल्या*
*4) लष्कर वाहतूक विभागाचे API विद्या सावंत व त्यांचे टीमने देसाई हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने 27 रिक्षा चालक, 55 स्कूल बस चालक व विभागाचे अंमलदार असे एकूण 82 व्यक्तींचे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करून अपघात टाळण्यासाठी जनजागृती अनुषंगाने सूचना दिल्या.*
*5) वानवडी वाहतूक विभागाच्या PI संगीता जाधव व त्यांच्या टीमने पुणे सोलापूर रोड वरील टर्फ क्लब ते भैरोबा नाला चौक दरम्यान रस्त्यावरील पडलेले खड्डे बुजवून घेऊन रोड सरफेसिंग करून रस्ता वाहतुकीस सुरक्षित व सुरळीत करून घेतला आहे*
🚔 *वाहनचालक व नागरिकांना खालीलप्रमाणे आवाहन करण्यात येते —* 🛑
1. 🪖 दुचाकी चालविताना नेहमी दर्जेदार हेल्मेटचा वापर करावा.
2. 🚶 रस्ता ओलांडताना पादचारी मार्ग व झेब्रा क्रॉसिंगचा वापर करावा .
3. 🚦 वाहतूक सिग्नलचे काटेकोरपणे पालन करावे.
4. 🏍️ अतिवेगाने वाहन चालवू नये. वेगावर नियंत्रण ठेवावे.
5. 📵 वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करू नये.
6. 🆘 रस्त्यावर अपघात झाल्यास जखमी व्यक्तीस तातडीने मदत करून वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत .
वाहतूक नियमांचे पालन ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे.
🙏 सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक नियमांचे पालन करा!
*“Safe Road PUNE 2026–सुरक्षित रस्ता, सुरक्षित प्रवास, सुरक्षित पुणे*
— *पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पुणे शहर* .
Post a Comment
0 Comments